मावा मोदक
प्रस्तावना::
चला गणपतीची आता सर्वांनाच आतुरता लागली आहे की आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे मोदक तयार करता येतील…
आणि मुलांना उत्सुकता असते मला कोणकोणते मोदक खायला मिळतील….मावा मोदक म्हटला म्हणजे मुलांना अत्यंत आनंद होतो…..
आजकाल मार्केटमध्ये नकली खवा जास्त विक्रीस येत आहे पण तो तुम्ही तपासून मगच घ्या… असली खवा थोडा पिवळसर असतो आणि त्याला दुधाचा सुगंध असतो… तर असाच आपण खवा घेऊ मोदक तयार करणार आहे…
साहित्य:::
- 150 ग्रॅम खवा
- 75 ग्रॅम पीठीसाखर
- एक चमचा तूप
- ५ काजू
- ५ बदाम
कृती:::
सर्वप्रथम मावा घ्या… मावा घेऊन त्याचे व्यवस्थित तुकडे तोडून घ्या… कारण कधी कधी मावा फ्रीजरमध्ये कडक झालेला असतो…….
त्यामुळे पटकन विरघळण्यासाठी तो तुकडे करा… आता कधी गरम करून त्यामध्ये एक चमचा तूप घाला आणि त्यामध्ये खवा घाला…
खवा विरघळल्यानंतर त्यामध्ये पिठी साखर घाला आता हा खवा जवळपास घट्ट गोळा तयार होईपर्यंत सतत ढवळत रहा…
गोळा तयार झाल्यानंतर त्यामध्ये बदामाची आणि काजूचे काप घाला……. त्यानंतर तयार केलेले माव्याचे मिश्रण ताटामध्ये काढून घ्या की थंड होऊ द्या….
मोदकाच्या साच्यामध्ये खव्याचे सारण भरून मोदक तयार करून घ्या…. मोदकाच्या साच्यामध्ये सारण घालताना दोन्ही बाजूला थोडे थोडे बदामाचे काप घाला……
आणि मग सारण भरा म्हणजे आपल्या मोदकाला बाहेरून सुंदर असे बदामाची काप दिसतील…. आपली मावा मोदक तयार झालेली आहे…
टिप्स:::
ज्यावेळेस आपण खवा वितळवतो त्यावेळेस खव्याचे मिश्रणाचा गोळा हा थोडा मऊसर असावा एकदम कडक करू नये नाहीतर मोदक कडक होतात….
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ :३०मिनिटे
परिमाण :११ मोदक
