चॉकलेट मावा मोदक

by Vaishali Chaudhari
6 views

चॉकलेट मावा मोदक


प्रस्तावना:::

आले आले माझे गणराज आले!!!!! आपल्या गणराज्यांसाठी आपल्याला चॉकलेट मावा मोदक बनवायचे आहे… तसेच आपल्या घराघरांमध्ये असणारी छोटे बालगणेश त्यांनाही चॉकलेट मावा मोदक खूप आवडतात.. ती कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे…


साहित्य:::

  • 150 ग्रॅम मावा किंवा खवा
  • 75 ग्रॅम पिठीसाखर
  • एक चमचा साजूक तूप
  • डार्क चॉकलेट 20 ग्रॅम मेल्ट केलेली किंवा दोन चमचे कोको पावडर


कृती:::

सर्वप्रथम माव्याचे तुकडे करून घ्या… बऱ्याचदा मावा हा फ्रिजमध्ये ठेवलेला असतो त्यामुळे तो एकदम कडक झालेला असतो ….

तुकडे केल्यानंतर तो पटकन वितळण्यास मदत होते…. कढई गरम करून त्यामध्ये एक चमचा तूप घाला आणि मावा घाला आणि मावा सतत ढवळत रहा..

त्यानंतर मावा विरघळल्यानंतर त्यामध्ये पिठीसाखर आणि चॉकलेट सिरप किंवा डार्क चॉकलेट 20 ग्रॅम मेल्ट केलेली किंवा दोन चमचे कोको पावडर घाला …..

आणि मिश्रणाचा गोळा तयार झाला कढईचे मिश्रण सुटायला लागेल म्हणजेच गोळा तयार होईल ….

आपल्या मोदकाचे मिश्रण तयार झालेले आहे असे समजावे.. आता ती एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यावे…

मोदकाच्या लहान साच्याला थोडे तूप लावून त्यामध्ये सारण घालून मोदक तयार करून घ्यावी…

मावा आणि चॉकलेट याचा मेळ झाल्यानंतर मुलांना अगदी चॉकलेटचा काहीतरी पदार्थ आपण खातोय …..

जणू काही चॉकलेटच खातोय एक चॉकलेट खाल्ल्याचे समाधान मुलांमध्ये येते आणि ते अगदी आवडीने खातात…

छान आणि एकदम चवदार टेस्टी असे आपले चॉकलेट मावा मोदक तयार झालेले आहेत….


टिप्स:::

इथे आपण डार्क चॉकलेटचा वापर करणार आहे तुमच्याकडे डार्क चॉकलेट नसल्यास तुम्ही कोको पावडर चा सुद्धा वापर करू शकता…


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ:: १०मिनिटे
एकूण वेळ:: ३०मिनिटे
परिमाण:११मोदक

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

13361

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.