खुसखुशीत खोबरा मोदक

by Vaishali Chaudhari
10 views

खुसखुशीत {तळणीचे}खोबरा मोदक


प्रस्तावना::

मोदक बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत.. ज्यावेळेस आपण मोदक बनवतो त्यावेळेस आपण ती कोणत्या पद्धतीने त्याचा गोळा मळतो हे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे आपले मोदक वातळ होतात… आणि खुसखुशीत होत नाही… खुसखुशीत होण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते… ते बघू!!!!!

साहित्य::

  • दीडशे ग्रॅम मैदा,
  • दीडशे ग्रॅम खोबरा कीस,
  • 100 ग्रॅम पिठीसाखर
  • चार ते पाच वेलची ची पूड
  • दोन चमचे काजू-बदामाचे काप
  • दहा ते बारा चारोळी
  • तीन चमचे साजूक तूप
  • तळण्यासाठी तेल किंवा साजूक तूप
  • चवीप्रमाणे मीठ


कृती:::

सर्वप्रथम आपण सारण तयार करून घेऊ… एका बाऊलमध्ये खोबऱ्याचा कीस पिठीसाखर काजू बदाम चे काप चारोळीएकत्र करून घ्या…

चार-पाच वेलची ची पूड एकत्र करून घ्या आपले सारण आता तयार झालेले आहेत… एका परातीमध्ये मैदा घाला त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला..

त्यानंतर त्यामध्ये तीन चमचे साजूक तूप घाला आणि सगळ्या मैद्याच्या मिश्रणाला चोळून घ्या मैद्याचा पिठाचा गोळा तयार होईल ….

इतपत आपल्याला साजूक तूप घालायचे आहे म्हणजे त्याला योग्य मोहन बसेल…. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून गोळा मळून घ्या….

लहान लहान गोळे तयार करून घ्या 21 किंवा 11 या प्रमाणात तुम्ही गोळे तयार करू शकतात…आता या गोळ्याच्या गोल पुऱ्या लाटून घ्या….

आता या पुऱ्यांमध्ये खोबऱ्याचे सारण घाला आणि मोदक तयार करा… मोदकाच्या कळ्या तशा आधी पाडून घ्यायच्या….

आणि मग सारण भरून वरतून ज्याप्रमाणे आपण पुरण भरतो त्याप्रमाणे पॅक करून घ्या आपला सुंदर कळीचा मोदक तयार होईल…

त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करा आणि मोदक तळून घ्या.. आपले खमंग असे मोदक तयार होतील… हे मोदक एकदम कुरकुरीत लागतील..

इथे मी मोदक तेलामध्ये तळले आहे तुम्ही साजूक तुपामध्ये सुद्धा हे मोदक तळू शकतात… परंतु ते मोदक दोन ते दिवस झाल्यानंतर तुपकट लागायला लागतात …..

त्यामुळे तेलात तळले तर मोदक तुपकट लागणार नाहीत…


टिप्स::: इथे तुम्ही मैद्याचा गोळा मळताना मिठाचा वापर नाही केला तरी चालेल परंतु मीठ घातल्यानंतर आपला मोदक चवदार लागतो..

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

13361

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.