निळा खोबरा मोदक

by Vaishali Chaudhari
2 views

निळा खोबरा मोदक

प्रस्तावना::

निळा मोदक हा नवीन प्रकारचा मोदक आहे…. मुलांना गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी रोजच एक नवीन प्रकार हवा असतो त्यातच रंगाची आवड मुलांना फार असते…. शिवाय आपण जे अपराजिताचे फुल किंवा गोकर्णचे निळे फुल वापरणार आहे त्यामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा आहेत… अत्यंत चवदार असा हा मोदक तयार होतो…


साहित्य::

  • 100 ग्रॅम खोबरा कीस
  • 60 ग्रॅम किंवा सहा चमचे मिल्क पावडर
  • 50 ग्रॅम पिठीसाखर
  • गोकर्णची फुले
  • अर्धी वाटी दूध
  • बदामाचे काप साजूक तूप


कृती::

सर्वप्रथम आपण घरगुती किस वापरत असल्यास तो मिक्सर मधून एकदम बारीक करून घ्यावा… एका भांड्यामध्ये एक वाटी गरम पाणी घ्या….

त्यामध्ये गोकर्ण चे फुल झाकण ठेवून वीस मिनिटे ठेवा.. जेणेकरून त्या पाण्यामध्ये गोकर्णच्या फुलांचा रंग उतरेल…

आता एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घाला त्यामध्ये गोकळण्याचे पाणी घाला त्यामध्ये मिल्क पावडर घाला आणि घट्ट करून घ्या…

एका बाऊलमध्ये खोबऱ्याचा कीस त्यानंतर मिल्क पावडर चे मिश्रण आणि 50 ग्रॅम पिठीसाखर घालून मिश्रण एकदम व्यवस्थित एकत्र करून घ्या

त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे दूध घाला जर गोळा करण्यास लागत असल्यास तरच दुधाचा वापर करा..

आणि त्याचा गोळा तयार करून घ्या.. अजून गरज वाटत असल्यास एक चमचा करत दूध घाला आणि छान असा आपला गोळा तयार करून घ्या…..

आपल्या मिश्रणाला सुंदर असा निळा रंग आलेला असेल…आणि गोळा व्यवस्थित एकत्र करून घ्या… त्यानंतर मोदकाच्या साच्याला साजूक तूप लावून घ्या…

आणि त्यामध्ये बदामाचे काप घालून त्यावर निळ्या रंगाचे सारण भरा आणि मोदक तयार करा….

आपली सुंदर असे निळा खोबरा मोदक आता तयार झालेले आहे दिसायला एकदम सुंदर रंग आणि चवीला अप्रतिम !!!!

चला तर मग एन्जॉय करूया आपण निळा खोबरा मोदक!!!!!


टिप्स:::

मोदक तयार करत असताना आपण दुधाचा वापर गरज असल्यास तरच करावा नाहीतर दूध लागणारही नाही….. कारण इथे आपण निळ्या रंगाच्या पाण्याचा वापर केलेला आहे.….

वेळ व परिमाण:::
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण::११ मोदक

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

13361

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.