केसर मावा मोदक
प्रस्तावना::
आले आले माझे गणराज आले!!!!! आपल्या गणराज्यांसाठी आपल्याला केसर मावा मोदक बनवायचे आहे… तसेच आपल्या घराघरांमध्ये असणारी छोटे बालगणेश त्यांनाही मोदक खूप आवडतात.. ती कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे…
साहित्य:::
- 150 ग्रॅम मावा किंवा खवा
- 75 ग्रॅम पिठीसाखर
- एक चमचा साजूक तूप
- केसरच्या पाच ते सहा धागे
- चिमूटभर पिवळा फूड कलर
- अर्धी वाटी दूध
कृती:::
सर्वप्रथम माव्याचे तुकडे करून घ्या… बऱ्याचदा मावा हा फ्रिजमध्ये ठेवलेला असतो त्यामुळे तो एकदम कडक झालेला असतो तुकडे केल्यानंतर तो पटकन वितळण्यास मदत होते….
त्यानंतर अर्धी वाटी दूध गरम करून घ्या त्यामध्ये केशराचे धागे घाला आणि ते सतत हलवून घ्या दुधाला पिवळसर रंग होईल …
कढई गरम करून त्यामध्ये एक चमचा तूप घाला आणि मावा घाला आणि मावा सतत ढवळत रहा..
त्यानंतर मावा विरघळल्यानंतर त्यामध्ये पिठीसाखर आणि केसरचे दूध आणि थोडा पिवळा फुड कलर घाला ….
आणि मिश्रणाचा गोळा तयार झाला कढईचे मिश्रण सुटायला लागेल म्हणजेच गोळा तयार होईल
आपल्या मोदकाचे मिश्रण तयार झालेले आहे असे समजावे..
आता ती एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यावे… मोदकाच्या लहान साच्याला थोडे तूप लावून साच्यात एक केसर चा धागा घाला …..
आणि त्यामध्ये सारण घालून मोदक तयार करून घ्यावी… छान आणि एकदम चवदार टेस्टी असे आपले केसर मावा मोदक तयार झालेले आहेत….
टिप्स:::
इथे आपण केसरचा वापर करणार आहे तुमच्याकडे केसर नसल्यास केसर इसेन्स आणि पिवळा फूड कलर चा सुद्धा वापर करू शकता…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:: १०मिनिटे
एकूण वेळ:: ३०मिनिटे
परिमाण:११मोदक
