रवा मोदक किंवा सुजी मोदक प्रकार 1 | Suji Modak type 1|

by Vaishali Chaudhari
32 views

रवा मोदक किंवा सुजी मोदक


प्रस्तावना:::

रवा मोदक झटपट तयार करण्यासाठी ते कसे तयार करायचे ते आपण आज बघणार आहोत…

रवा मोदक किंवा सुजी मोदक प्रकार 1 | Suji Modak type 1|


साहित्य::

रवा मोदक किंवा सुजी मोदक प्रकार 1 | Suji Modak type 1| – फोटो 2
  • एक वाटी बारीक रवा किंवा सुजी
  • अर्धी वाटी साखर
  • अर्धी वाटी पाणी
  • ३ चमचे साजूक तूप
  • 10 काजू
  • 10 बदाम
  • 15 ते 20 चारोळी
  • 10किसमिस


कृती::

सर्वप्रथम तीन चमचे कढईमध्ये तूप घाला… तूप चांगले गरम झाले की त्यामध्ये काजू बदाम आणि किसमिस व्यवस्थित फ्राय करून घ्या आणि ते काढून घ्या…

लागत असल्यास पुन्हा दोन चमचे तूप घाला आणि त्यामध्ये रवा घाला इथे आपण बारीक रव्याचा वापर करणार आहे….

रवा मोदक किंवा सुजी मोदक प्रकार 1 | Suji Modak type 1| – फोटो 3

रवा चांगला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला परतावायचा आहे..

रव्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मलई चा वापर करायचा आहे मलाही घालून सर्व मिश्रण दोन मिनिटे चांगले परतवून घ्या त्यामध्ये अर्धी लहान वाटी तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट पावडर घाला…

रवा सतत ढवळत रहा आता रव्याला गोल्डन रंग आला की गॅस बंद करा… एका भांड्यामध्ये भाजलेला रवा मिश्रण घाला…

आपण आपल्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट वापरू शकतो मी ते किसमिस चा वापर केलेला नाही… परंतु तुम्ही किसमिस घालू शकतात तसेच पिस्त्याचे काप सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकतात…

एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घाला त्यानंतर त्याला उकळी आल्यानंतर एका तारेचा पाक करा…

रवा मोदक किंवा सुजी मोदक प्रकार 1 | Suji Modak type 1| – फोटो 6

पाक तयार झाला की गॅस लगेच बंद करा त्यामध्ये हा रवा घाला रवा घातल्यानंतर आपण जे ड्रायफूट फ्राय करून घेतलेले आहेत किंवा तळून घेतलेले आहेत ते घाला …..

रवा मोदक किंवा सुजी मोदक प्रकार 1 | Suji Modak type 1| – फोटो 7

आणि सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित एकत्र करून घ्या… इथे आपल्याला पाकामध्ये मिश्रण शिजवायचे नाही नाहीतर मोदक कडक होतील…

रवा मोदक किंवा सुजी मोदक प्रकार 1 | Suji Modak type 1| – फोटो 8

पाक रव्याच्या मिश्रणामध्ये छान पैकी मुरून जाईल… आता मिश्रण थंड झाले की लगेचच त्याचे मोदकाच्या साच्याला तूप लावून रव्याचे सारण त्यामध्ये घाला….

रवा मोदक किंवा सुजी मोदक प्रकार 1 | Suji Modak type 1| – फोटो 9

आणि मोदक तयार करून घ्या आपले रव्याचे मोदक बाप्पासाठी तयार आहे…

रवा मोदक किंवा सुजी मोदक प्रकार 1 | Suji Modak type 1| – फोटो 10

चला तर मग तुम्ही करून बघताय ना बाप्पा साठी नैवेद्य रव्याचे मोदक किंवा सुजी मोदक!!!!!

टिप्स::

तुपामध्ये रवा चांगला मंद आचेवर चांगला दहा ते पंधरा मिनिटे परतून घ्यावा… रवा चांगला परतला की आपले मोदक एकदम चवदार आणि खरपूस लागतात….


वेळ व परिमाण::
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण:: ११मोदक

Recipees खालील लिंक्स वर click करून माहिती माहिती मिळवून घ्यावी.

  1. रवा मोदक किंवा सुजी मोदक
  2. मोतीचूर मोदक
  3. ड्रायफूट मोदक
  4. पान मोदक
  5. पनीर मोदक
  6. खुसखुशीत खोबरा मोदक
  7. चॉकलेट खोबरा मोदक
  8. गुलकंद खोबरा मोदक
  9. खोबरा मोदक
  10. पाकाचे काजूचे मोदक
  11. काजूचे मोदक
  12. उकळीचे मोदक
  13. मावा मोदक
  14. चॉकलेट मावा मोदक
  15. मावा गुलकंद मोदक
  16. ओरिओ बिस्कीट मोदक
  17. केसर मावा मोदक
  18. सुजी मोदक प्रकार 2

आपणास हा पोस्ट आवडली असल्यास जास्तीत जास्त share करा

ही रेसिपी करून पाहिल्यावर तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला खालील comment मध्ये लिहून नक्की कळवा. तसेच आपण हि ह्याच पद्धतीने भरीत बनविता काय ? आपण कोणत्या पद्धतीने बनविता ते हि कळवा

अशाच पारंपरिक, घरगुती आणि खानदेशी चवीच्या रेसिपीसाठी Swaad GharCha ला भेट देत राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

9 comments

सुजी मोदक प्रकार 2 | Suji Modak type 2 - swaadgharcha.com September 26, 2026 - 7:15 am

[…] रवा मोदक किंवा सुजी मोदक https://swaadgharcha.com/rawa-modak-kinva-suji-modak/ […]

Reply
ड्रायफूट मोदक - swaadgharcha.com September 26, 2026 - 7:57 am

[…] रवा मोदक किंवा सुजी मोदक […]

Reply
चॉकलेट खोबरा मोदक - swaadgharcha.com September 26, 2026 - 8:02 am

[…] रवा मोदक किंवा सुजी मोदक […]

Reply
उकळीचे मोदक - swaadgharcha.com September 26, 2026 - 8:06 am

[…] रवा मोदक किंवा सुजी मोदक […]

Reply
केसर मावा मोदक - swaadgharcha.com September 26, 2026 - 8:07 am

[…] रवा मोदक किंवा सुजी मोदक […]

Reply

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.