ड्रायफूट मोदक
प्रस्तावना:::
ड्रायफूट मोदक तयार करत असताना तुमच्याकडे जेवढे ड्रायफूट असतील तेवढे तुम्ही वापर करू शकतात…
साहित्य:::
- एक वाटी काजू
- एक वाटी बदाम
- एक मोठी वाटी खोबरा कीस
- दोन वाटी शिंगाडा पीठ
- एक वाटी किसमिस
- एक वाटी पमकीन सीड
- एक वाटी अक्रोड
- एक वाटी पिठीसाखर
- एक वाटी साजूक तूप
कृती:::
सर्वप्रथम सर्व ड्रायफ्रूट काजू बदाम आतूपअक्रोड साजूक तुपामध्ये भाजून घ्या त्याची जाडसर अशी पूड तयार करून घ्या…
हे केल्यानंतर थोडे ड्रायफूट त्यात वरून गार्निश करण्यासाठी राहू द्या बाकीचे एका वाटीत काढून घ्या…. त्यानंतर कढईमध्ये चार चमचे साजूक तूप घाला …..
त्यामध्ये दोन वाटी शिंगाळ्याचे पीठ चांगले चार ते पाच मिनिटे तूप सुटेपर्यंत परतवून घ्या… जोपर्यंत शिंगाळा पिठाला तूप सुटत नाही तोपर्यंत ते परतवून घ्या…
त्यानंतर हे मिश्रण एका बाउल मध्ये काढा….. त्यानंतर त्यामध्ये खोबरा कीस काजू, बदाम अक्रोड चे पूड घाला….
नंतर त्यामध्ये किसमिस घाला …. त्यानंतर यामध्ये एक वाटी पिठीसाखर घाला आता याचे मिश्रनाचे गरम गरमच आपल्याला मोदक करून घ्यायचे आहे….
मोदकाच्या साच्याला तूप लावून त्यावर थोडे काजू बदाम पसरवून त्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित भरून घ्यायचे आहे आणि असे सर्व मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहे….
आपले ड्रायफूट मोदक तयार झाले आहे… आपल्या बापाच्या नैवेद्यासाठी तयार आहे ड्रायफ्रूट मोदक!!!
टिप्स:::
इथे मोदक करताना पिठीसाखरेचा वापर आपण केलेला आहे तुम्हाला गुळाचा वापर करायचा असल्यास त्याच प्रमाणात गुळ घालावा मात्र गुळ घालताना गूळ हा बारीक किसून घ्यावा… म्हणजे मिश्रणाचा चांगला गोळा ही तयार होईल आणि सर्व मिश्रणामध्ये गूळ व्यवस्थित एकत्र होईल…
वेळ आणि परिमाण:::
तयारीची वेळ::३०मिनिटे
एकुण वेळ:: ५०मिनिटे
परिमाण::२१ मोदक
