उकळीचे मोदक

प्रस्तावना:::
उकडीचे मोदक म्हटले की बाप्पाला खूपच आवडतात… सगळ्यात आवडीचा प्रसाद म्हणजे उकडीचे मोदक!!!! पण मी मोदक कसे तयार करायचे त्याची उकड कशी काढायची आणि उकड जरी तयार केली तर ती कच्ची राहील का त्याचा गोळा व्यवस्थित होईल का आणि हे सर्व केल्यानंतर आपल्या मोदकाला चिरा जातील क???
या सर्वां प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या रेसिपी मधून मिळून जातील….
साहित्य::

- एक मोठा नारळ (एक मोठी वाटी नारळाचा बारीक किस)
- अर्धी वाटी गूळ
- एक वाटी तांदळाची पिठी
- आठ ते दहा काजू-बदामाचे काप
- साजूक तूप
- केशर चे धागे
- चार ते पाच वेलचीची पूड
कृती::
उकडीच्या मोदकात भरायचे सारण याची कृती::::
सर्वप्रथम ओला नारळ घेऊन तो फोडून घ्या.. फोडल्यानंतर त्याचे बाहेरील काळे आवरण काढून टाका…
आणि नारळ किसून घ्या… आणि मिक्सरमध्ये बारीक असा त्याचा चुरा करून घ्या… त्यानंतर कढईमध्ये तूप घाला त्यामध्ये ओल्या नारळाचा किस घाला…

दोन ते तीन मिनिटे ओल्या नारळाचा कीस परतत आल्यानंतर त्यामध्ये किसलेला गूळ घाला.. किसलेल्या गुळामुळे झटपट मिश्रण तयार होते…

त्यानंतर त्यामध्ये तीन ते चार वेलचीची पूड करून घ्या आणि ती खोबरं गुळाच्या मिश्रणामध्ये घाला… त्यानंतर यामध्ये काजू-बदामाचे काप घाला..

आता आपला घट्टसर गोळा तयार झालेला असेल… म्हणजे आपले मिश्रण तयार झाले.. आपल्या उकडीच्या मोदकांमध्ये भरण्यासाठीचे सारण तयार आहे…
उकड तयार करण्याची कृती:::
सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या… ते वाळवून घ्या… तांदूळ वाळल्यानंतर त्याचे बारीक असे पीठ दळून घ्या..
ही तयार झाली तांदळाची पिठी…. आता एका कढईमध्ये एक ग्लास इतके पाणी घालायचे आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे आहे…
पाण्याला चांगल्या खळखळ उकळ्या आल्यानंतर त्यामध्ये तांदळाचे पीठ घालून लाटण्याच्या साह्याने घेरून घ्यायची आहे. .
तांदळाचे पीठ घेताना सतत मिश्रण ढवळत रहा म्हणजे त्यामध्ये गाठी होणार नाही… आता या मिश्रणाचा गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवून चांगली पाच मिनिटे वाफ येऊ द्यायची आहे…

पाच मिनिटे वाफ आल्यानंतर मिश्रणाचा गोळा एका ताटामध्ये काढा… ताटामध्ये दोन चमचे साजूक तूप घाला आणि वाटीच्या साह्याने हे मिश्रण चुरून घ्या..

म्हणजे हाताला गरम लागणार नाही शिवाय मिश्रण व्यवस्थित एकजीव होईल.. आता हे मिश्रण थोडे गार झालेले असेल पाण्याचा हात घेऊन या मिश्रणाचा एक मऊसर गोळा तयार करून घ्या..
हा गोळा चांगला हाताने चुरून मऊ करा… आपली उकडीच्या मोदकांची उकड तयार झालेली आहे…
उकळीचा मोदक तयार करण्याची पद्धत:::
आता मोदकाच्या साच्याला साजूक तूप लावून घ्या त्यामध्ये उकडी चा गोल गोळा तयार करून आपल्या हाताला साजूक तूप लावून हळूहळू किनारी दाबून घ्या……
म्हणजे जी उकड जास्त ची आहे ती बाहेर येईल आणि मध्ये खोलगट भाग तयार करा… आता या खोलगट भागामध्ये आपल्याला हवे तितके सारण भरा.. जितके जास्त सारण तितकी मोदकाची चव उत्तम!!!

सारण भरल्यानंतर जे एक्स्ट्रा चे सारण बाहेर आले होते ते दाबून घ्या… जे एक्स्ट्रा सारण बाहेर आले आहे ते तसेच राहू द्या ते काढून टाकू नका…
म्हणजे तुमचा उकडीचा मोदक कुठूनही फुटणार नाही किंवा चीरही जाणार नाही कारण आपण जो गोळा घेतलेला होता त्यातील एक्सट्राची सारण आपण बाहेर काढले होते…..
खालील बाजूस बंद करण्यास आपण त्याच गोळ्याचा वापर आपण करणार आहे वरतून कुठलीही तांदळाची उकड त्याला लावली नाही……

आता उकडीचा मोदक काढून घ्या मोदकाच्या साच्यात एकदम छान अशा कळ्या मोदकाला पडतात… या पद्धतीने सर्व मोदक तयार करून घ्या…
तसेच मोदक तयार करण्याची दुसरी पद्धत:::
दुसरी पद्धत म्हणजे तांदळाच्या पिठीचा गोल गोळा करून तो तुम्ही हाताला तूप लावून त्याची पारी तयार करून घ्या…. आणि हाताला तूप लावून त्याच्या कळा पाडून घ्या आणि मग त्यामध्ये सारण भरा …..
आणि अलगद ज्याप्रमाणे आपण पुरण भरतो त्याप्रमाणे वरील भाग बंद करा आपला छानसा कळ्यांचा मोदक तयार होईल….

आता तयार झालेली सर्व मोदक एका चाळणीला तूप लावून त्यामध्ये रचून द्या… मोदक रचल्यानंतर त्यावर केशराची धागे लावा…

एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून त्याला चांगल्या उकड्या येऊ द्या… त्यावर ही चाळणी ठेवा … त्यावर झाकण ठेवा…

साधारण दहा ते बारा मिनिटे उकळीचे मोदक वाफवून घ्या… त्यानंतर मोदकांचा गॅस बंद करून उकडीचे मोदक काढून घ्या….

किश्राच्या धाग्यामुळे आपल्या मोदकांना सुंदर असा रंग आलेला असेल… त्यावर साजूक तूप घाला आणि गरमागरम मोदक बाप्पा साठी तयार झाले आहेत…
टिप्स::::
उकड काढताना योग्य असे प्रमाण मी तुम्हाला सांगितले आहे त्याच पद्धतीने तुम्ही उकड काढल्यास तुमची उकड बिघडणार नाही…
शिवाय उकड तयार केल्यानंतर ती अगदी व्यवस्थित मळून घ्यावी त्यामुळे मोदकांना चिरा जात नाही… मोदक तयार करत असताना तुपाचा हात लावल्याने आपली उकड हाताला चिकटत नाही किंवा त्याचा तुकडाही पडत नाही….
वेळ आणि परिमाण::
तयारीची वेळ::२० मिनिटे
एकूण वेळ:::६० मिनिटे
परिमाण::२१ मोदक
