युनिक आणि रसरसीत झटपट गुलाब जामून मोदक UNIQUE AND RASRASIT INSTANT GULAB JAMUN RACIPE

by Vaishali Chaudhari
33 views

गुलाब जामुन मोदक


प्रस्तावना(Introduction):::

युनिक आणि रसरसीत झटपट गुलाब जामून मोदक UNIQUE AND RASRASIT INSTANT GULAB JAMUN RACIPE – फोटो 2

मोदक खूप प्रकारचे बघितले आहेत आपण आज आपण गुलाब जामुन मोदक बनवले ती पण खव्यापासून अगदी छान असे मोदक आपले तयार होतात…


साहित्य(Ingredients):::

युनिक आणि रसरसीत झटपट गुलाब जामून मोदक UNIQUE AND RASRASIT INSTANT GULAB JAMUN RACIPE – फोटो 3

125 ग्रॅम खवा 40 ग्रॅम मैदा 150 ग्रॅम साखर दोन वेलची करण्यासाठी तू प


कृती(Procedure):::

सर्वप्रथम खवा चांगला मिक्स करून घ्या… त्यातील गाठी मोडून घ्या.. हाताच्या साह्याने तो चांगला स्मॅश करा…

युनिक आणि रसरसीत झटपट गुलाब जामून मोदक UNIQUE AND RASRASIT INSTANT GULAB JAMUN RACIPE – फोटो 4

हाताच्या तळव्याने तो मऊ करा… त्यानंतर त्यामध्ये 40 ग्रॅम मैदा घाला आणि व्यवस्थित गोळा तयार करा…

युनिक आणि रसरसीत झटपट गुलाब जामून मोदक UNIQUE AND RASRASIT INSTANT GULAB JAMUN RACIPE – फोटो 5

त्यानंतर मोदकाच्या साच्याला साजूक तूप लावून मोल्डमध्ये मोदकाचा आकार द्या.…या पद्धतीने 11 मोदक तयार करून घ्या…

युनिक आणि रसरसीत झटपट गुलाब जामून मोदक UNIQUE AND RASRASIT INSTANT GULAB JAMUN RACIPE – फोटो 6

अकरा मोदक तयार झाले की मग… एका पातेल्यामध्ये साखर घाला त्यामध्ये अर्धा ग्लास इतके पाणी घाला….

युनिक आणि रसरसीत झटपट गुलाब जामून मोदक UNIQUE AND RASRASIT INSTANT GULAB JAMUN RACIPE – फोटो 7

त्यानंतर त्यामध्ये आपण दोन वेलचींचे पूड घालणार आहे… आणि एकतारी पाक तयार करून घ्या… पाकाचा गॅस बंद करा त्यानंतर कढईमध्ये तूप घाला…

युनिक आणि रसरसीत झटपट गुलाब जामून मोदक UNIQUE AND RASRASIT INSTANT GULAB JAMUN RACIPE – फोटो 8

तूप गरम झाल्यानंतर त्यानंतर आपण तयार केलेले खव्याचे मोदक तळून घ्या…. त्यानंतर हे तळलेले मोदक पाकामध्ये घाला…

युनिक आणि रसरसीत झटपट गुलाब जामून मोदक UNIQUE AND RASRASIT INSTANT GULAB JAMUN RACIPE – फोटो 9

मोदक तयार करत असताना मोदक फुल्यामुळे मोदकांचा जो आकार असतो तो तळल्यानंतर पाकामध्ये घातल्यानंतर बदलून जातो ……

युनिक आणि रसरसीत झटपट गुलाब जामून मोदक UNIQUE AND RASRASIT INSTANT GULAB JAMUN RACIPE – फोटो 10

त्यामुळे सुरीच्या साह्याने तुम्ही आपण ज्या कळ्या पडल्या आहेत त्या सुरीच्या साह्याने दाबून घेऊ शकता म्हणजे जेणेकरून जो आकार आहे तो पूर्ववत येईल….

पाक मुरल्यानंतर एक ते दोन तासानंतर पाकातून मोदक वेगळे करून घ्या… आपले गुलाबजाम मोदक तयार झालेले आहे…

युनिक आणि रसरसीत झटपट गुलाब जामून मोदक UNIQUE AND RASRASIT INSTANT GULAB JAMUN RACIPE – फोटो 11


टिप्स(Tips):::

खव्यामध्ये मैद्याचे प्रमाण अगदी योग्य घालावे तुमचा कवा पाव किलो असल्यास त्याला 125 ग्रॅम इतका मैदा वापरायचा आहे….

तसेच तुमचा खवा एक किलो या प्रमाणामध्ये असल्यास त्यामध्ये पाव किलो इतका मैदा घालायचा आहे… म्हणजे तुमचे गुलाबजाम मोदक विरघळणार नाही किंवा तेलात वितळणार सुद्धा नाही एकदम उत्तम असे गुलाबजाम मोदक तयार होतील….


वेळ व परिमाण(Time And Quantity):::


तयारीची वेळ::२० मिनिटे
एकूण वेळ:: ४०मिनिटे
परिमाण::११ मोदक

#UkadicheModak #ModakRecipe #EasyModakRecipe #GanpatiRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #SwaadGharcha

Recipees खालील लिंक्स वर click करून माहिती माहिती मिळवून घ्यावी.

  1. रवा मोदक किंवा सुजी मोदक
  2. मोतीचूर मोदक
  3. ड्रायफूट मोदक
  4. पान मोदक
  5. पनीर मोदक
  6. खुसखुशीत खोबरा मोदक
  7. चॉकलेट खोबरा मोदक
  8. गुलकंद खोबरा मोदक
  9. खोबरा मोदक
  10. पाकाचे काजूचे मोदक
  11. काजूचे मोदक
  12. उकळीचे मोदक
  13. मावा मोदक
  14. चॉकलेट मावा मोदक
  15. मावा गुलकंद मोदक
  16. ओरिओ बिस्कीट मोदक
  17. केसर मावा मोदक
  18. सुजी मोदक प्रकार 2
  19. रवा मोदक किंवा सुजी मोदक प्रकार 1

आपणास हा पोस्ट आवडली असल्यास जास्तीत जास्त share करा

ही रेसिपी करून पाहिल्यावर तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला खालील comment मध्ये लिहून नक्की कळवा. तसेच आपण हि ह्याच पद्धतीने भरीत बनविता काय ? आपण कोणत्या पद्धतीने बनविता ते हि कळवा

अशाच पारंपरिक, घरगुती आणि खानदेशी चवीच्या रेसिपीसाठी Swaad GharCha ला भेट देत राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.