सुजी मोदक प्रकार 2

by Vaishali Chaudhari
4 views

सुजी मोदक प्रकार नंबर २


प्रस्तावना::

सुजीचे मोदक वेगवेगळ्या प्रकारचे असतात…. यामधील सर्वात सोपा प्रकार म्हणजे हा सुजी मोदक प्रकार नंबर दोन झटपट तयार होणारा….. आणि अगदी सहज कमी साहित्यामध्ये तयार होणारा…


साहित्य::

  • अर्धी वाटी रवा(सुजी)
  • अर्धी वाटी तूप
  • अर्धी वाटी साखर
  • एक वाटी दूध…
  • तीन वेलची पूड
  • काजू बदाम चे काप
  • आठ ते दहा मनुका


कृती:::

सर्वप्रथम कढईमध्ये तूप घाला… तू वितळल्यानंतर त्यामध्ये मनुका परतवून घ्या.. त्यानंतर त्यामध्ये काजू बदामचे काप परतवून घ्या…

त्यानंतर त्यामध्ये रवा घाला.. रव्याला चांगले पाच मिनिटे मंद आचेवर परतवून घ्या… रव्याला छान तूप सुटलेले असेल…

त्यानंतर त्यामध्ये साखर घाला., साखर घातल्यानंतर साखर विरघळेपर्यंत सारखं परतवत रहा….. आता यामध्ये एक वाटी दूध घाला…

आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या… दूध घातल्यानंतर आपल्या रव्याच्या मिश्रणावर झाकण ठेवा… साधारण तीन मिनिटे मिश्रणाला चांगली वाफ येऊ द्या…

मिश्रण चांगला गोळा तयार झालेला असेल… आता हा रव्याच्या मिश्रणाचा गोळा थंड होऊ द्या… मोदकाच्या साच्याला तूप लावून त्यामध्ये काजू-बदामाचे काप घाला …..

आणि रव्याचे मिश्रण घाला आणि छान असा मोदक पाचे सारण भरून घ्या…. अप्रतिम असे मोदक तयार होतात…

हे घालत असताना तुम्ही मनुका सुद्धा मोल्डमध्ये घालू शकतात आणि मग रव्याचे सारण घालून मोदक तयार करून घेऊ शकतात….

इथे आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे… आपले छानसे सुजी किंवा रव्याचे मोदक तयार झालेले आहे…


टिप्स:::

वरचे मी प्रमाण सांगितले आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे सुजीचे मिश्रण तयार करायचे आहे म्हणजे तुमचे मोदक परफेक्ट होतील नाहीतर मिश्रण इतर पातळ होईल एक तर एकदम कडक होऊन जाईल.. योग्य प्रमाणात मोदक उत्तम होतील…


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::२५ मिनिटे
परिमाण::११ मोदक

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

14767

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.